श्रीलंकन यादवी युद्ध हे श्रीलंकेच्या द्वीपावर लढले गेलेले युद्ध होते. २३ जुलै १९८३ रोजी या संघर्षाची सुरुवात झाली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम (एल.टी.टी.ई.) ही फुटीरवादी संघटना व श्रीलंकेचे सरकार यांच्यामध्ये हे युद्ध झाले. एल.टी.टी.ई.ला श्रीलंकेच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोकांसाठी तमिळ ईलम नावाचे स्वतंत्र राष्ट्र हवे होते. शेवटी २६ वर्षांनंतर श्रीलंकन सरकारला १८ मे २००९ रोजी यश मिळाले.
८०,००० ते १,००,००० लोक या युद्धात मृत्युमुखी पडले. लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलमला अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा व युरोपियन संघासह ३२ देशांनी दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली.
श्रीलंकन यादवी युद्ध
थोडक्यात पण महत्त्वाचे.