श्यामची आई

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे.

नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी ही कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३

रोजी पहाटे त्या संपविल्या..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →