शैलेन्द्र राजवंश हा सध्याच्या इंडोनेशियामधील एक प्राचीन राजवंश होता. या वंशातील राज्यकर्ते इ.स.च्या ८व्या शतकात जावामध्ये सत्तेवर होते. या काळात तेथे सांस्कृतिक पुनरुत्थान झाले. हे राजे महायान बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते होते व त्यांनी मध्य जावातील केदू पठारावर अनेक बौद्ध धर्मस्थळे उभारली. बोरोबुदुरचा स्तूप हा त्यातील एक होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शैलेंद्र राजवंश
यामागील विज्ञान आणि इतिहास.