शेवटचे संधी पर्यटन हा एक अत्यंत संवेदनशील प्रवासाचा प्रकार आहे, हवामान बदलामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक सौंदर्याचा एक मोठा भाग हळूहळू नाहीसा होत आहे. त्यामुळेच शेवटचे संधी पर्यटन (लास्ट चान्स टुरिझम) हा ट्रेंड वाढताना दिसत आहे. ज्यामध्ये लोक त्या ठिकाणांना भेट देतात जे नैसर्गिक, सांस्कृतिक किंवा हवामान बदलांमुळे लवकरच नष्ट होण्याच्या किंवा मोठ्या प्रमाणात बदल होण्याच्या स्थितीत आहेत.
उदाहरणार्थ, आर्क्टिकमधील वितळणारे हिमनग, धोक्यात आलेली प्रवाळभित्ती किंवा अतिवृष्टीमुळे नष्ट होणारी जंगलं ही ठिकाणे आहेत, जिथे लोक अशा जागांना शेवटच्या क्षणी पाहण्यासाठी जातात, या पर्यटनाला "शेवटचे संधी" असे नाव यासाठी दिले जाते कारण हे पर्यटकांना त्या ठिकाणांचे सौंदर्य पाहण्याची शेवटची संधी म्हणून समजले जाते, कारण भविष्यात ही ठिकाणे अस्तित्वात राहणार नाहीत किंवा ती पूर्णपणे बदलली जाऊ शकतात.
वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या २०२१ च्या अहवालानुसार, प्रवासामुळे एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सुमारे ८ ते ११ टक्के योगदान मिळते. उपरोधिकपणे, अशा धोक्यात आलेल्या ठिकाणांना बघण्यासाठी प्रवास करणारे प्रवासी स्वतःच त्या बदलांना गती देत आहेत, ज्यामुळे ती ठिकाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
शेवटची संधी पर्यटन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?