गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यता हरित क्रांती पूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे.परंतु हरितक्रांती आणि विजेचे सर्वत्रीकरण यामुळे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि लवकरच भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. दुष्काळ पडला आणि पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. त्याच काळात बोअरवेलचे तंत्रज्ञान पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अस्तित्वात आले. बोअरवेल्सच्या पाण्याचा भरमसाठ उपसा केला आणि परिणामी भूजलाची पातळी खूप खोल गेली.त्यामुळे जेव्हा अगदी खोलवर उभे व आडवे बोअरवेल घेऊनही पाणी मिळणे दुर्लभ झाले. पावसाळ्यात शेतातून वाहून जाणारे पाणी शेततळ्यातच अडवायचे व हेच पाणी टंचाईच्या काळात पिकांसाठी वापरायचे हे यामागील मुख्य हेतू होता, तर शेततळ्याचे पाणी भूजलाची पातळी उंचवण्यास साह्यभूत ठरेल. परंतु शेततळ्यांची संख्या आणि त्यात पाणी साठवण्यासाठी होणारा भूजलाचा अनिर्बंध वापर व उपसा यामुळे शेततळी भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्यास कारणीभूत ठरत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेततळी उपाय कि नवी समस्या
थोडक्यात पण महत्त्वाचे.