शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आर्द्रता व कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला मांडव होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस सौरऊर्जा वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. हे सर्व जमले नाही तर सर्वस्व पणाला लागण्याची शक्यता असते. असे असले तरी नव्या तंत्रामधील काही उपतंत्रे सर्वानाच वापरणे शक्य असून त्यामुळे आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात अमुलाग्र बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांचे मुख्य शत्रू म्हणजे तण व रोगराई. त्यांचे उच्चाटण केल्यास उत्पादन खर्चात प्रचंड बचत होऊ शकते. म्हणजेच फायद्यात तेवढीच वाढ होते. म्हणूनच नव्या तंत्रांमधील आपल्या सोयीची व सोपी तंत्रे आत्मसात करून वापरणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.अलीकडे खूप शेतकरी मल्चिंग पेपरचा उपयोग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मल्चिंग पेपरमुळे पिकामध्ये अजिबात तण वाढत नाहीत. त्यामुळे खुरपणीचा प्रचंड खर्च पूर्णतः वाचतो. मजुरांची टंचाई व मजुरीचे वाढलेले दर यामुळे खुरपणीचा खर्च अवास्तव वाढला असून तणांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. एक एकरातील मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांच्या चार खुरपण्या कराव्याच लागतात. प्रत्येक खुरपणी सरासरी दोनच हजार रुपयांत झाली तर एकरी ८ हजार रुपये खर्च कमीत कमी येतोच. मल्चिंग पेपरसाठी एकरी ३ बंडल लागतात. त्यासाठी बाजारात ४ फूट रुंदीचा मल्चिंग पेपर उपलब्ध आहे. त्याचे दोन फूट रुंदीचे दोन भाग करून वापरल्यास मल्चिंग पेपर निम्माच लागतो. १२०० फुटाचा प्रत्येक बंडल २ हजार रुपयांना बाजारात मिळतो. म्हणजेच एकरी सहा हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच खुरपणीपेक्षा येथेच २ हजार रुपये वाचतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेडनेट हाऊस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.