शीला भाटिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

शीला भाटिया

शीला भाटिया (१ मार्च १९१६ - १७ फेब्रुवारी २००८) ह्या भारतीय कवयित्री, नाटककार, आणि भारतीय कलाप्रकारांच्या संवर्धनासाठी दिल्ली येथील दिल्ली आर्ट थिएटरच्या संस्थापक होत्या. त्या अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाशी पण संबंधीत होत्या. पंजाबी ओपेरा, एक भारतीय नृत्य नाटकाचा प्रकार आहे ज्यामध्ये ओपेरा सारख्या हालचालींचा समावेश होतो. १९५० व १९६० च्या दशकात हा शिला भाटिया यांनी निर्माण व प्रसिद्ध केला आहे.

हिंदी आणि उर्दू नाटकांसाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले. १९७१ मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री, या चौथ्या भारतीय नागरी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. एका दशकानंतर त्यांना १९८२ मध्ये नाटक दिग्दर्शनासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९९७ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →