शिकारा ही एक प्रकारची लाकडी बोट आहे जी जम्मू आणि काश्मीरमधील दल सरोवर आणि श्रीनगरच्या इतर जलस्रोतांवर आढळते. शिकार विविध आकाराचे असतात आणि वाहतुकीसह अनेक उद्देशांसाठी वापरले जातात. सहसा शिकारामध्ये सहा लोक बसू शकतात, व वाहक मागे वल्हवत असतो. ते काश्मीरचे सांस्कृतिक प्रतीक आहेत. काही शिकारे अजूनही मासेमारी, जलीय वनस्पतींची कापणी (सहसा चारा म्हणून) आणि वाहतुकीसाठी वापरली जातात, तर बहुतेक शिकारे ताडपत्रीने झाकलेली असतात आणि पर्यटक वापरतात. दल सरोवरातील शिकाऱ्याची सहल ही दल सरोवराचे सौंदर्य अनुभवण्याचा आणि स्थानिकांच्या जीवनाची झलक पाहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. काही शिकारे तरंगती घरे म्हणून वापरली जातात.
शिकारा बनवणे हे देवदार लाकडावर आधारित आहे (जे पाण्यात विघटित होत नाही) आणि त्याची लांबी २५ ते ४१ फूट असते. शिकाऱ्याचा पुढचा भाग टोकदार, मध्यवर्ती भाग लाकडाच्या ८ फळ्यांपासून बनलेला आणि शेवट एका सपाट भाग असतो. लाकडी फळ्यांमुळे प्रत्येक बाजूच्या उंचीला १.५ फूट उभी उंची मिळते.
जोडणीसाठी वापरलेले खिळे आणि लोखंडी क्लॅम्प्स लाकडात तिरपे चिकटवले जातात जेव्हा ते गरम असतात, जेणेकरून ते अधिक मजबूत बंधन सुनिश्चित करतील. बोटीच्या दृश्य सौंदर्यासाठी त्यांना लपवून ठेवण्याची काळजी घेतली जाते. सीलिंगसाठी चिनारच्या बिया असलेली पेस्ट वापरली जाते. ही बोट १० ते १२ दिवसांत तयार होते.
बोटीच्या मध्यवर्ती भागात बसण्याची व्यवस्था असते ज्या खाली सामान ठेवायला कप्पे पण असतात. चार खांबांवर एक छत उभारले असते. मध्यभागी आणि टोकांना लोखंडी हुक आणि लाकडी खुंटे आहे, जे तलावाच्या काठावर शिकार बांधण्यासाठी वापरले जातात. शिकारांना अखेर चमकदार रंगात रंगवले जाते आणि पुढे पॉलिश, कोरिव काम आणि सुशोभित केले जाऊ शकते.
शिकारा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.