शार्लीझ थेरॉन (इंग्लिश: Charlize Theron; ७ ऑगस्ट १९७५) ही एक दक्षिण आफ्रिकन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकापासून हॉलिवूड सिनेइंड्रस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या थेरॉनला २००३ साली प्रदर्शित झालेल्या मॉन्स्टर ह्या चित्रपटासाठी ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. हा सन्मान मिळवणारी ती पहिली दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री आहे. तसेच २००५ सालच्या नॉर्थ कंट्री ह्या चित्रपटासाठी देखील तिला ऑस्कर व गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शार्लीझ थेरॉन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.