शारदीय नवरात्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शारदीय नवरात्र

शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात (ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

सैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो.

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →