शकुंतला (राजा रविवर्मा)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शकुंतला (राजा रविवर्मा)

शकुंतला किंवा दुष्यंताला शोधणारी शकुंतला हे भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचे १८९८ मधील तैलचित्र आहे.

रविवर्मा यांनी शकुंतला या महाभारतातील एका महत्त्वाचे पात्राचे चित्र रेखाटले आहे. या चित्रात शकुंतला तिच्या पायाचा काटा काढण्याचे नाटक करत असते, परंतु प्रत्यक्षात तिचा प्रियकर दुष्यंतला शोधत असते. यावेळी तिच्या मैत्रिणी तिची छेड काढतात.

तापती गुहा-ठाकुर्ता या कला इतिहासकाराने या चित्राबद्दल लिहिले

"या चित्रातील हावभाव - डोके आणि शरीराची ही वळण - दर्शकाला कथानकात खेचून घेते. या दृश्याला प्रतिमा व घटनांच्या एका काल्पनिक मालिकेत स्थान देण्यास प्रवृत्त करते. स्वतःहून, हे चित्र एका गोठलेल्या दृश्यासारखे (एखाद्या चित्रपटातील स्थिर दृश्याप्रमाणे) दिसते, जे घटनांच्या चालू असलेल्या दृश्यावलीतून उचलून घेतलेले आहे. ही चित्रे स्त्री प्रतिमेची व्याख्या करण्यात 'पुरुषी दृष्टिकोना'च्या केंद्रस्थानी असलेल्या भूमिकेचेही प्रतिबिंब दाखवतात. चित्राच्या चौकटीत अनुपस्थित असूनही, पुरुष प्रियकर एक महत्त्वाचा संदर्भबिंदू बनतो, त्याची नजर शकुंतला आणि दमयंतीला 'इच्छित' प्रतिमांमध्ये खिळवून ठेवते, आणि त्यांना काव्यात्मक व कामुक आदर्श म्हणून सादर करते."

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →