व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. (पुस्तक)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड, औली इ. हे प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेले आणि स्नेहल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे.

हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जावे असे अनेकांना वाटत असते. पण तिथे कसे जावे? काय पाहावे? अडचणी काय येतात? ह्या पुष्पदरीचा शोध कुणी लावला? तिथं आढळणाऱ्या फुलांची नावे काय आहेत? त्यांची वैशिष्ट्ये कोणती? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वनस्पती अभ्यासक व पर्यटनप्रेमी प्र. के. घाणेकरांच्या या पुस्तकात मिळतील. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणानंतर निसर्गसौंदर्याची टिपलेली छायाचित्रे आहेत. फुलपाखरांचे प्रकार, फुलांच्या विविध जाती यांचीही नावांसकट माहिती दिलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →