व्यंकटरामा पंडित कृष्णमूर्ती (२६ नोव्हेंबर १९२३ - ७ एप्रिल २०१४) उर्फ व्ही. के. मूर्ती या व्यावसायिक नावाने ओळखले जाणारे एक भारतीय चित्रपटसृष्टीतील छायाकार होते. एकेकाळी व्हायोलिन वादक आणि तुरूंगात बंदी होणारे स्वातंत्र्यसैनिक मूर्ती हे गुरू दत्तचे नियमित कॅमेरामन होते. त्यांनी भारतीय कृष्ण धवल चित्रपटातील काही उल्लेखनीय प्रतिमा प्रदान केल्या. कागज के फूल हा भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रीकरणही त्यांनी केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २००५ मध्ये आयफा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१० मध्ये त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्ही.के. मूर्ती
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!