व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह (रशियन: Вячеслав Молотов; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा एक सोव्हिएत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हिएत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता.
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत व नाझी जर्मनी ह्यांच्या दरम्यान झालेल्या गुप्त करारामध्ये मोलोतोव्हने सहभाग घेतला होता. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार ह्या नावाने मोलोतोव्ह व नाझी परराष्ट्रमंत्री योआखिम फॉन रिबेनट्रॉप ह्यांच्यामध्ये झालेल्या ह्या करारामध्ये पोलंड देशाचे विभाजन व एकमेकांवर अनाक्रमणाचे वचन दिले गेले होते.
युद्ध संपल्यानंतर मोलोतोव्हचे सोव्हिएतमधील महत्त्व कमी झाले. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मोलोतोव्हने स्टॅलिनच्या धोरणांचा पाठिंबा चालू ठेवला. तो निकिता ख्रुश्चेव्हच्या राजवटीचा मोठा टीकाकार होता.
व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!