वेळास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
वेळास येथील समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कासवांची ही जात भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट असल्यामुळे कायद्याने संरक्षित आहे. चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या पुढाकाराने येथे या अंड्यांचे संरक्षण करण्यात येते. आणि या अंड्यांतून कासवांची पिल्ले बाहेर पडेपर्यंत काळजी घेतली जाते. अंड्यांमधून बाहेर पडलेली कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने जायला निघतात, त्यावेळी ‘कासव महोत्सव’ आयोजित केला जातो. या निमित्ताने पर्यटक वेळासला भेट देतात. त्यांच्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची सोय करून गावातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वेळास (मंडणगड)
या विषयावर तज्ञ बना.