विश्व विपस्सना पॅगोडा (ग्लोबल विपस्सना पॅगोडा) हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट असतात, तर डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या ५ हजाराच्या वर असते. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्व विपस्सना पॅगोडा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.