विवेक (अभिनेता)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गणेश अभ्यंकर तथा विवेक (१६ फेब्रुवारी, १९१८ - ९ जून, १९८८) हे मराठी कृष्णधवल चित्रपटांतील अभिनेता होते.

विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ सालच्या भक्तीचा मळा या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५० च्या बायको पाहिजे या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना विवेक असे नाव दिले. हे नाव अभ्यंकरांनी पुढे वापरले. कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते.

विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.

अंबरनाथ येथील नवप्रकाश चित्र या चित्रसंस्थेच्या हमारी कहानी या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. हा चित्रपट प्रकाशित झाला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →