विवाह (चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विवाह हा २००६ मधील भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक चित्रपट होता. सुराज आर. बड़जात्या यांनी हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. यातील प्रमुख कलाकार शाहिद कपूर आणि अमृता राव आहेत. याची निर्मिती आणि वितरण राजश्री प्रॉडक्शनने केले होते. विवाहा दोन व्यक्तींची कहाणी आहे. यात लग्न ठरल्यापासून लग्नापर्यंतची, लग्नाची आणि लग्नानंतरची गोष्ट आहे.

विवाह हा शाहिद कपूर आणि अमृता राव या दोघांची भूमिका असणारा चौथा चित्रपट आहे. १० नोव्हेंबर २००६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा त्या वर्षातील सर्वात मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट झाला. याने जगभरात एकूण ₹५३.९ करोड (यूएस 7.8 दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त कमाई केली. याचे मिश्र समिक्षण झाले. काही समिक्षकांना हे नाटकीयरित्या उणीव नसलेले आणि न फुललेले वाटले. परंतु काही समिक्षकांना यातील लग्नाचे चित्रण ज्या पद्धतीने केले आहे त्या मार्गाने बदल घडवून आणण्याचे श्रेय देखील दिले गेले आहे. ते एक अनपेक्षित यश होते. शाहिद कपूर आणि अमृता राव यांचे त्या काळचे सर्वात मोठे व्यावसायिक यश ठरले.

शाहिद कपूरच्या अभिनयाने त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळवून दिले तर अमृता रावला स्क्रीन अ‍ॅवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषीक मिळाले. विवाह हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो एकाच वेळी सिनेमा थिएटर आणि इंटरनेटवर प्रदर्शित झाला (प्रॉडक्शन कंपनीच्या अधिकृत साइटद्वारे). हा चित्रपट तेलगू भाषेतही डब करण्यात आला होता आणि परिणयम नावाने प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →