विल्यम जोन्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विल्यम जोन्स

सर विल्यम जोन्स हे 'एशियाटिक सोसायटी'चे संस्थापक आणि अध्यक्ष होते. हे इ.स. १७८३ मध्ये इंग्लंडहून भारतात आले व रामलोचन पंडितांच्या कडून ते पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकले. डायजेस्ट ऑफ हिंदू अँड मोहमडन लॉज, एशियाटिक मिसलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरुड पुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचे त्यांनी सर्वप्रथम भाषांतर केले व भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून दिली.



ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेले विल्यम जोन्स यांची खरी ओळख भाषाशास्त्री, प्राच्यविद्यापंडित, विधिशास्त्री आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलचे संस्थापक म्हणून आहे. लंडनमध्ये वेस्टमिन्स्टरमध्ये १७४६ साली जन्मलेल्या विल्यमचे वडील हे वेल्समधील एक विख्यात गणितज्ञ होते. त्यांनीच ‘पाय’ (स्र्) ही संकल्पना शोधून काढली. विल्यमचे शिक्षण हॅरो स्कूल आणि ऑक्स्फर्डच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये होऊन ते एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. भाषाशास्त्राची आवड उपजतच असलेल्या विल्यमने इंग्लिश आणि वेल्श या मातृभाषांव्यतिरिक्त ग्रीक, लॅटीन, पर्शियन, अरेबिक, हिब्रू या भाषांवर तरुण वयातच प्रभुत्व मिळवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर विल्यमनी सहा वर्षे शिकवण्या घेऊन अनुवादक म्हणून काम केले. या काळात त्यांनी डेन्मार्कच्या राजाच्या सांगण्यावरून ‘नादीर शाह’ या पर्शियन पुस्तकाचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →