विन्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डबल स्प्रिंग्ज येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,५४० इतकी होती.
विन्स्टन काउंटीची रचना १२ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. १८५८पर्यंत या काउंटीला हॅन्कॉक काउंटी असे नाव होते. त्यानंतर या काउंटीला अलाबामाच्या गव्हर्नर जॉन ए. विन्स्टनचे नाव दिले गेले. अमेरिकन यादवी युद्धात अलाबामा अमेरिकेतून विभक्त होऊ पाहताना या काउंटीने विभक्त होण्यास विरोध केला.
विन्स्टन काउंटी, अलाबामा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.