विनोद कुमार शुक्ल (१ जानेवारी, १९३७; राजनांदगाव - २३ डिसेंबर, २०२५; रायपूर) हे एक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी भाषेतील लेखक होते. ते बहुतेक वेळा जादू-वास्तववादाशी संबंधित लिखाण करत असत. त्यांच्या कामांमध्ये नौकर की कमीज आणि दीवार में एक खिरकी राहती थी या कादंबऱ्यांचा समावेश आहे. दिग्दर्शक मणि कौल यांनी १९९९ मध्ये नौकर की कमीज वर आधातीर चित्रपट बनवला आहे. त्यांना १९९९ मध्ये दीवार में एक खिरकी राहती थी या कादंबरीसाठी हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. ही कादंबरी नाट्यदिग्दर्शक मोहन महर्षी यांनी रंगभूमीवर साकारली आहे. त्यांना २०२१ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.
मार्च २०२५ मध्ये, त्यांच्या अपवादात्मक आणि काव्यमय कार्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान असलेला ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला. २१ नोव्हेंबर, २०२५ रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील त्यांच्या घरी आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विनोद कुमार शुक्ल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.