विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल हे रायगड जिल्ह्यातील समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही अवलंब केला. ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगडच्या जंगलात ते आपल्या टीमसह भूमिगत असताना ब्रिटिश पोलीस अधिकारी डीएसपी आर. हॉल यांच्याशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विठ्ठल लक्ष्मण कोतवाल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!