विजयशांती श्रीनिवास (२४ जून, १९६६ - ) एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी आहेत. आपल्या ३० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत, त्यांनी तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी असे विविध भारतीय भाषांमधील १८०हून अधिक वैशिष्ट्यीकृत चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. दक्षिण भारतीय सिनेमाची त्यांना द लेडी सुपरस्टार आणि लेडी अमिताभ" म्हणून ओळखले जाते. पोलीस अधिकारीच्या भुमीकेत कर्तव्यम (१९९०) मध्ये संतुलन आणि संयम सह आक्रमकता आणि स्त्रीत्व दोन्ही दर्शविण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. २००२ मध्ये तिला तमिळनाडू सरकारकडून कलाईममणी पुरस्कार मिळाला. त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण व चार नंदी पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजयशांती श्रीनिवास
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.