विंडोज लाइव वनकेर

या विषयातील रहस्ये उलगडा.

विंडोज लाइb वनकेर तथा विंडोज वनकेर लाइव ही मायक्रोसॉफ्टद्वारे विंडोजसाठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते, जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये जीईसीएडी सॉफ्टवेर कडून विकत घेतले होते. परंतु नंतर ते बंद करण्यात आले. हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.

१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर विंडोज ७ वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते विंडोज एक्सपी मोड मध्येही काम करणार नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →