विंचू

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विंचू

विंचू (इंग्रजी: scorpion) हा एक विषारी प्राणी आहे. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून ह्याने नांगी मारल्यास माणूस दगावू शकतो.



विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.

या विंचवाच्या विषावरचा उतारा (अँटी-सिरम) मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. हे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →