वा.द. वर्तक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रा. डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (१९ नोव्हेंबर, १९२५:भोर संस्थान, महाराष्ट्र - १७ एप्रिल, २००१, पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते.

त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्यावर प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांचा प्रभाव होता. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्रीची पर्वतराजी येथील बहुतेक सर्व वनस्पती त्यांनी नोंदविल्या. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात दहा वर्षे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी वर्तकांनी आघारकरांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांनी १६ पीएच.डी. प्रबंधांसाठी मार्गदर्शन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →