वास्तववाद ही आंतरराष्ट्रीय संबंधासंबंधीची एक विचारधारा आहे, ज्याची सुरुवात अधुनिक युरोपाच्या सुरुवातीच्या काळातील रियल पॉलिटीक राज्यकारभारापासून झाली़. जरी त्यामधे अनेक विचारांचा समावेश होत असला तरी जागतिक राजकारण म्हणजे अंतिमतः सत्ता मिळविण्यासाठी विविध कृतिशील घटकांचा आपापसातील संघर्ष आहे, अशी त्यांची मध्यवर्ती संकल्पना आहे. वास्तववादात मुख्यत्वे तीन विचारधारा आहेत. पारंपारिक वास्तववाद मानवी स्वभावाला केंद्रस्थानी ठेवतो. नववास्तववाद राज्यव्यवस्थेच्या अराजकी रचनेवर भर देतो. नवपारंपारिक वास्तववाद वरील दोहोंच्या एकत्रीकरणावर आधारित आहे. या शिवाय वास्तववादाचे काही स्थानिक प्रकार पण आहेत. राज्यांनी जागतिक राजकारणाला दिशा कोणत्या प्रकारे द्यावी यावरून वास्तववादाचे संरक्षक वास्तववाद[१] आणि आक्रमक वास्तववाद असे दोन तट पडतात (बहुतांश वास्तववादी या दोन्ही गटात बसत नाहीत). वास्तववाद्यांचा असा दावा आहे की त्यांच्या विचारधारेतील परंपरांना प्राचीन इतिहासआहे, ज्यात थुसिडिडस, थॉमस हॉब्ज, कौटिल्य आणि निकोलो मॅकीयावेली यांचा समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वास्तववाद (आंतरराष्ट्रीय संबंध)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.