वनस्पतिशास्त्रीय नाव: Embelia ribes
कुळ:Myrsinaceae
नाम:- (सं.) विडंग; (हिं.) बबेरंग, बाबरंग; (पं.) बब्रुंग; (नेपाळ) हिमळचेरी; (गु.) वावडींग; (क.) वायुविलंग; (ता.) वायुविळगम्; (सिंगाली) उंबेलिअ; (मुंबई) कर्कनी, वायवरंग, वायमिरी.
वर्णन:- वावडिंगाचा खूप लांब असा वेल असतो. दुसऱ्या झाडाभोवती विळखे घातल्याने वेलाची जाळी तयार होते.वेलाचे खोड सडपातळ पण खरखरीत असून त्यास पुष्कळ गाठी असतात. पाने दोन्ही टोकास निमुळती, फुले पांढरी व मोठाल्या तुऱ्यातुऱ्यांनी येतात; फळे मिऱ्यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात. वावडिंगे मिऱ्यांसारखी वा कबाबचिनीसारखी दिसतात. फळास देठासकट पांच पट्ट्यांचे एक पुष्पपात्र चिकटलेले असते व टोकाकडे लहान काटा असतो. रंग तांबूस उदी असून फळावर उभे पट्टे असतात. फळ जुने झाले की काळे पडते. फळ फोडल्यास आंत भुरकट लाल रंगाचा पुष्कळ मगज असतो व एक बी असते.
रसशास्त्र:- वावडिंग रूचकर पण जरासे कडवट आणि तुरट असते, त्यांत त्याच्या वजनाच्या अडीच टक्के असे एक अम्लधर्मी द्रव्य (Embelic acid एम्बेलिक् ऍसिड्= विडंगाम्ल) असते.
गुण:- वावडिंग हे उष्ण, दीपक, पाचक, जरासे आनुलोमिक व मूत्रजनक, उत्तम कृमिघ्न, वायुहर, बळ देणारे,विशेषतः, मेंदू व मज्जातंतूस ्शक्ती देणारे, रक्तशोधक रसायन आहे. ह्याने लघवीचा रंग लाल होतो व त्यांतील अम्लता वाढते. वावडिंगाची क्रिया शरीरांतील सर्व ग्रंथींवर, मुख्यत्वे रसग्रंथींवर होत असते. त्यामुळे सर्व जीवनविनिमयक्रियेस उतेजना मिळते. मात्रा:- १/२ ते १ तोळा. लहान मुलास १ ते २ वाल. मात्रा कमीजास्त झाल्यास हरकत नाही. कारण हे निरूपद्रवी औषध आहे. हे घेत असतां पथ्य करण्याची जरूर पडत नाही.
उपयोग:
मनुष्याचे शरीरावर वावडिंग विलक्षण गुणकारी आहे. वावडिंग घेणाऱ्याला भूक लागते, अन्न पचते, शौचास साफ होते, वजन वाढते, त्वचेचा रंग सुधारतो, शरीर तेजःपुंज दिसते व मनास आल्हाद वाटतो.
लहान मुलांच्या रोगांत तर हे दिव्य औषध आहे. मुले सुद्दढ राहण्यास अखंड वावडिंग दुधांत उकडतात व ते दूध देतात.
आंकडी, फेफरें, अर्धांगवायु वगैरे मेंदू व मज्जातंतूच्या रोगांत वावडिंग लसणाबरोबर दुधांत उकडून, ते दूध देतात.
त्वचारोगांत वावडिंग पोटात देतात व त्याचा लेप करतात. कधी धुरीहि देतात.
तऱ्हेतऱ्हेचे कुष्ठरोग अन्न नीट पचन न झाल्यामुळे उद्भवतात. वावडिंगाने पचनक्रिया सुधारल्यामुळे व शौचास साफ झाल्यामुळे कुष्ठ बरे होतात आणि शिवाय वावडिंगाची त्वचेवर थोडीबहुत उत्तेजक क्रियाहि होत असते.
हे फार मौल्यवान कृमिघ्न आहे. ह्या औषधाने कृमी मरून पडतात
वावडिंग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.