वाराणसी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वाराणसी

वाराणसी (किंवा काशी, बनारस) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडले.

काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. दिवोदासाच्या कर्मयोगामुळे काशी मध्ये देवाने वास्तव्य केले.म्हणून दिवोदासाला आठवले पाहिजे. हे शहर बनारस, वाराणसी, काशी, अविमुक्त (शंकराच्या वास्तव्यामुळे), आनंदकानन/आनंदवन(शंकराला आनंद देणारे वन), काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास (रुद्राचे राहण्याचे ठिकाण), श्रीशिवपुरी वगैरे नावांनी ओळखले जाते. येथील काशी विश्वेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते.

हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

जगातील सर्वांत जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे.

हे शहर, महाभारत युद्धात पांडवांकडून लढणाऱ्या काशी राजाने वसविल्यामुळे यास 'काशी'/'काशिका' हे नाव पडले.

काशीमध्ये गंगाकिनारी बांधलेले एकूण ८८ घाट आहेत. त्यांची नावे :-



१) अमरोहा/अमरावगिरी/बाउली घाट,

असी घाट,

अहिल्याबाई घाट,

माता आनंदमयी घाट,

कर्नाटक घाट,

(६) केदार घाट,

खिडकी घाट,

खोरी घाट,

गंगामहाल घाट-१,

गंगामहाल घाट-२,

(११) गणेश घाट,

गुलेरिया घाट (मूळ),

गुलेरिया घाट/नया घाट,

गोल घाट,

(१५) चेतसिंग घाट,

चौकी घाट,

चौसत्ती घाट,

जलासेम (जलाशायी) घाट,

जातरा घाट,

(२०)जानकी घाट,

जैन घाट,

तुलसी घाट,

तेलियानाला घाट,

त्रिपुरभैरवी घाट,

(२५) त्रिलोचन घाट,

दरभंगा घाट,

दशाश्वमेध घाट,

दांडी घाट,

दिग्पतिया घाट,

(३०) दुर्गा घाट,

नंदेश्वर/नंदू घाट,

नारद घाट,

निरंजनी घाट,

(३५) निषाद घाट,

नेपाळी/घाट,

पंचअग्नी अखाडा घाट,

पंचकोट घाट,

पंचगंगा घाट,

(४०) पांडे घाट,

प्रभू घाट,

प्रयाग घाट,

प्रल्हाद घाट,

फुटा/नया घाट,

(४५) बद्रीनारायण घाट,

बाजीराव घाट,

बुंदी परकोट घाट,

ब्रह्मा घाट,

भदैनी घाट,

(५०) भैसासुर घाट,

भोसले घाट,

मंगलागौरी/बाला घाट,

मनकर्णिका घाट,

मनमंदिर घाट,

(५५) महानिर्वाणी घाट,

मानससरोवर घाट,

मीर घाट,

मुनशी घाट,

मेहता घाट,

(६०) राजा घाट,

राजा ग्वाल्हेर घाट,

राजेंद्रप्रसाद घाट,

राणा महाल घाट,

राणी घाट,

(६५) राम घाट,

रावण/रीवा घाट,

ललिता घाट,

लली घाट,

लाल घाट,

(७०) वत्सराज घाट,

विजयनगर घाट,

वेणीमाधव घाट,

शाक्य घाट,

शिवाला घाट,

(७५) (आदि)शीतला घाट,

संकट घाट,

सर्वेश्वर घाट,

सिंदिया घाट,

सोमेश्वर घाट,

(८०) हनुमान घाट,

जुना हनुमान घाट,

हनुमानगारदी घाट,

हरिश्चंद्र घाट,

(८४) क्षेमेश्वर घाट.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →