जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये निसर्गतः नसणारे घन किंवा घन कण तसेच जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक किंवा अत्याधिक प्रमाणात वाढ होते ह्याला वायू प्रदूषण असे म्हणतात. यामुळे मानवांमध्ये रोग, ॲलर्जी आणि मृत्यूदेखील होऊ शकतात. हे इतर प्राणी,अन्न, पिके अश्या इतर सजीवांना तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया ह्या दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात. केवळ बाहेरील वायू प्रदूषणामुळे २.१ ते ४.२१ दशलक्ष अकाली लोकांचा मृत्यू होतात.
२०१४ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता.
मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळल्याने त्रास होतो, तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायू प्रदूषणास जबाबदार आहेत असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
वायू प्रदूषण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.