वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कऱ्हाड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
तसेच कराड-चिपळूण मार्गावर कराड पासून १३ किलोमीटर अंतरावरील वसंतगड हे एक गाव आहे .
त्या गावातून म्हणजे कराड चिपळूण या राजमार्ग पासून उत्तर बाजूस ३ किलोमीटर अंतरावर किल्ले वसंतगड आहे . या गडावर जाण्यासाठी वसंतगड गावातून सुद्धा वाट आहे .
तसेच पुणे - बेंगलोर या महामार्गावरील तळबीड फाट्याला उतरून तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कराडवरून एस. टी. बसेसची सोय आहे. वसंतगड हा इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावाच्या होत्या.
वसंतगड
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.