वळू किंवा सांड हा गायीचा नर आहे. हा प्राणी अंगाने तगडा असतो. प्रजोत्पादनास या प्राण्याचा उपयोग होतो. महाराष्ट्रातील काही जातिवंत खिल्लार वळूंच्या नावावर जास्तीत जास्त १७/१८ गाई एका दिवसाला नेसर्गीक रेतन करण्याचे रेकॉर्ड देखील आहे. काही वळूनी त्यांच्या १५ वर्षाच्या आयुष्यात जवळपास ११,००० पेक्षा जास्त गाई देखील नेसर्गीक रेतन केलेल्या आहेत. सध्या खिल्लार गोवंशामध्ये पंढरपूर जवळील सिद्धापूर गावातील खिल्लार खान सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जुनी मानली जाते. या सिद्धापूर खाणीतील सर्वात जास्त पैदास आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाहायला मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वळू
या विषयातील रहस्ये उलगडा.