वडूज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा म्हणूनही ह्या जिल्ह्याने ओळख निर्माण केली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वांना परिचित आहे. मात्र, या तालुक्यातील काही गावे आपल्या वैशिष्ट्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध पावली आहेत. या तालुक्याचे मुख्य कचेरीतील गाव वडूज हे हुतात्म्यांची भूमी आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला आहे. पण, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वडूज येथे नऊ स्वातंत्र्य सैनिकांना आपले प्राण अर्पण करावे लागले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाचा सेन्सस कोड ५६३५३७ असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या १७६३६ आहे. गावात ३८४८ कुटुंबे राहतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वडुज
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.