ल्येव तल्स्तोय

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

ल्येव तल्स्तोय

लिओ टॉल्स्टॉय (रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой) (जन्म : सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा.

दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी झाली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →