लोककथा म्हणजे पारंपरिक आणि परंपरेने बोलीभाषेत असलेली कथा होय. लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते. एखादी प्रमुख घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबलेला असतो तो लोककथे मध्ये प्रचलित होत जातो. या कथांसाठी बहुदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसतात. तसेच या कथा पूर्वी या लिखित स्वरूपातही आढळत नसत. कथाकार आपल्या माहिती किंवा आवडी प्रमाणे त्यात बदल करत जातो. त्यामुळे मूळ कथेसोबत अनेक उपकथा निर्माण होत जातात. तसेच लोककथा आणि इतिहास ह्यांमधे काहीवेळा सरमिसळ होत जाते. त्यामुळे कथा इतिहास विषयक संदर्भ देतात परंतु त्याचे पुरावे मात्र नसतात. जसे, पुंडलिक या भक्ता समोर पांडुरंग प्रकटला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोककथा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.