लुसियस ॲनेयस सेनेका किंवा फक्त सेनेका (इ.स.पू. ४ - इ.स. ६५ ) हा एक रोमन तितिक्षावादी तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट निरोचा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे. त्याचे वडील सेनेका थोरले तर भाऊ गॅलियो हे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुसियस ॲनेयस सेनेका
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?