लिसा मरी ॲस्टल (१७ मे, १९७३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. ही न्यूझीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडून १९९३ विश्वचषक स्पर्धेत एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळली. ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये कँटरबरी मॅजिशियन्स संघाकडून खेळली.
ॲस्टलचा जन्म क्राइस्टचर्च येथे झाला. हीवयाच्या २०व्या वर्षी १९९३ विश्वचषकात डेन्मार्कविरुद्ध तिचा एकमेव आंतरराष्ट्रीय सामना खेळली. त्या सामन्यात तिला फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. लिसाचा भाऊ नेथन ॲस्टल हादेखील न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तिने रॉबी फ्र्यूशी लग्न केले. हा कँटरबरी संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला.
लिसा ॲस्टल
या विषयातील रहस्ये उलगडा.