लहान मुलांचे हक्क हा मानवी हक्कांचा एक उपसमूह आहे. ज्यात अल्पवयीनांना दिले जाणारे विशेष संरक्षण आणि काळजी च्या अधिकारांकडे विशेष लक्ष दिले जाते. (युवकांचे हक्क वेगळे आहेत). इ.स. १९८९ च्या कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड (सीआरसी) ने बालकाची व्याख्या "अठरा वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, जोपर्यंत बालकाला लागू असलेल्या कायद्यानुसार, त्यापूर्वी प्रौढत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत." मुलांच्या हक्कांमध्ये पालक, मानवी ओळख तसेच शारीरिक संरक्षण, अन्न, सार्वत्रिक राज्यातर्फे मोफत शिक्षण, आरोग्य सेवा आणि मुलाच्या वयासाठी आणि विकासासाठी योग्य असलेले गुन्हेगारी कायदे, समान संरक्षण या मूलभूत गरजा यांचा समावेश आहे. मुलां-मुलींचे नागरी हक्क आणि मुलां-मुलींची वंश, लिंग, लैंगिक अभिमुखता, लिंग ओळख, राष्ट्रीय मूळ, धर्म, अपंगत्व, रंग, वांशिकता किंवा इतर वैशिष्ट्यांच्या आधारावरील भेदभावापासून मुक्तता. मुलां-मुलींच्या हक्कांचे स्पष्टीकरण त्यांना स्वायत्त कारवाईची क्षमता देण्यापासून ते बालकांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या शोषणापासून मुक्त होण्यापर्यंतची श्रेणी असते. या कायद्याचा "दुरुपयोग" म्हणजे काय हा वादाचा मुद्दा आहे. इतर व्याख्यांमध्ये काळजी आणि पालनपोषणाचे अधिकार समाविष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये "किशोरवयीन", "किशोर" किंवा "युवा" यांसारख्या तरुण लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर संज्ञांची व्याख्या नाहीत. परंतु मुलांच्या हक्कांची चळवळ युवा हक्क चळवळीपेक्षा वेगळी मानली जाते. मुलांच्या हक्कांचे क्षेत्र कायदा, राजकारण, धर्म आणि नैतिकता या क्षेत्रांमध्ये पसरलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लहान मुलांचे हक्क
यामागील विज्ञान आणि इतिहास.