ललितेश्वर प्रसाद शाही (ऑक्टोबर १, १९२०- जून ९, २०१८ ) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते १९८० च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्याच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बिहार विधानसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ललितेश्वर प्रसाद शाही
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.