लग जा गले (गीत)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लग जा गले (गीत)

"लग जा गले" हे हिंदी गीत आहे जे राजा मेहदी अली खान यांनी लिहले होते, तर संगीत मदन मोहन कोहलींनी दिले होते. १९६४ च्या "वो कौन थी?" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले. पडद्यावर हे गाणे चित्रपटाची नायिका असलेल्या साधनाने सादर केले होते, तर लता मंगेशकर यांनी गायले होते.

तमिळ, तेलुगू आणि बंगालीसारख्या अनेक भाषांमध्ये या गाण्याचा आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच हिंदीमध्ये आजपर्यंत बऱ्याच वेळा विविध चित्रपटांत या गाण्याच्या अनेक आवृत्त्या तयार केल्या गेल्या.

अभिनेत्री साधनाचे निधन झाल्यावर तिला या गाण्याची अभिनेत्री म्हणून संबोधून तिचे अनेकदा स्मरण केले गेले. अभिनेता इरफान खानचे २०२० मध्ये कर्करोगाने निधन झाले. तो त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे गाणे ऐकत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →