रेवदंडा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. अलिबागपासून १७ किमी वर असलेले हे गाव रेवदंडा किल्ल्यात अंशतः वसलेले आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.
येथे ज्यू लोकांची वस्ती आहे. यांचे वंशज ७००हून अधिक वर्षांपूर्वी येथून जवळ नागाव येथे आले व या परिसरात वसले. हे लोक ज्यू धर्माच्या शिकवणीनुसार शनिवारी सॅबाथ पाळतात. यांचा भारतातील मूळ धंदा तेल्याचा होता. या दोन गोष्टींमुळे या परिसरातील ज्यू लोकांना शनिवार तेली असेही म्हणले जाते. रेवदंड्यातील बेथ एल सिनॅगॉग कोंकणी वास्तूशैलीत असून जगातील इतर सिनेगॉगपेक्षा वेगळा आहे.
येथून जवळ असलेल्या टेकडीवर दत्तमंदिर आहे. सुमारे १,५०० पायऱ्या असलेल्या या मंदिरात दत्तजयंतीपासून पाच दिवस उत्सव असतो.
ख्रिश्चन संत सेंट फ्रांसिस झेवियरने येथे आपल्या भारतातील पहिल्या काही उपदेशात्मक प्रवचनांपैकी (सर्मन) एक येथे दिल्याचे समजले जाते.
रेवदंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
रेवदंडा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.