रेल्वे फलाट

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रेल्वे फलाट किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे रेल्वे स्थानकावरील रेल्वे लोहमार्गाच्या शेजारी असलेला एक भाग जिथून प्रवास्यांना गाड्यांमध्ये सोयीस्कर प्रवेश करता येतो. जवळजवळ सर्व स्थानकांवर काही ना काही फलाट असतात, तर मोठ्या स्थानकांवर अनेक फलाट असतात.

मिडटाउन मॅनहॅटनमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनलमध्ये ४४ फलाट आहेत, हा आकडा जगातील इतर कोणत्याही रेल्वे स्थानकापेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात लांब १,५०७ मीटर (४,९४४ फूट) लांबीचा रेल्वे स्थानकातील फलाट भारतातील हुबळी जंक्शन येथे आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील अ‍ॅपलाशियन ट्रेल स्थानक किंवा बेन्सन स्थानकात एक फलाट आहे जो फक्त एका बाकासाठी पुरेसा असेल एवढाच लांब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →