रेचेल ट्रेनामन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रॅचेल कॅथरीन ट्रेनामन (१८ एप्रिल, २००१ - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि अधूनमधून उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करते. ती महिला राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये टास्मानियासाठी आणि महिला बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्ससाठी खेळते.

ट्रेनामनने २०१६ च्या उत्तरार्धात वयाच्या १५ व्या वर्षी न्यू साउथ वेल्सकडून पदार्पण केले आणि डब्लूबीबीएल|०३ साठी सिडनी थंडर संघात तिचा समावेश करण्यात आला. २०१८ च्या सुरुवातीला तिची दक्षिण आफ्रिका येथील १९ वर्षांखालील दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ५० षटकांच्या संघनायकपदी नियुक्ती करण्यात आली. या मालिकेत तिने १२२ आणि ९१ धावा केल्या तसेच तीन बळी घेतले.

नोव्हेंबर २०१८ मध्ये २०१८-१९ महिला बिग बॅश लीग हंगामासाठी सिडनी थंडरच्या संघात तिला समाविष्ट करण्यात आले. एप्रिल २०१९ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१९-२० हंगामापूर्वी तिची राष्ट्रीय कामगिरी संघात निवड केली. तिने २०२२-२३ महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग हंगामापूर्वी टास्मानिया संघात प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →