रामचंद्र चिंतामण ढेरे (जन्म : निगडे-पुणे जिल्हा, २१ जुलै, इ.स. १९३० - पुणे, १ जुलै, इ.स. २०१६) हे मराठी इतिहास-संशोधक व लेखक होते. ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामण गंगाधर ढेरे, आईचे शारदा आणि पत्नीचे इंदुबाला असे होते. त्यांना डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर अशा दोन कन्या आणि मिलिंद ढेरे नावाचा छायाचित्रकार मुलगा आहे.
रा. चिं. ढेरे आणि इंदुबाला यांचा १९५५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्या दोघांनी ६१ वर्षे संसार केला होता. रा.चिं ढेरे यांचे निधन १ जुलै २०१६ रोजी झाले तर इंदुबाला ढेरे १७ जानेवारी २०१७ला देवाघरी गेल्या
रामचंद्र चिंतामण ढेरे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!