राधाबिनोद पाल (२७ जानेवारी १८८६ - १० जानेवारी १९६७) हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ होते जे १९५२ ते १९६६ पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कायदा आयोगाचे सदस्य होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या जपानी युद्ध गुन्ह्यांच्या "इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनल फॉर द फार इस्टसाठी" ("तोक्यो ट्रायल") नियुक्त केलेल्या तीन आशियाई न्यायाधीशांपैकी ते एक होते. ट्रिब्युनलच्या (न्यायाधीकरणाच्या) सर्व न्यायाधीशांपैकी, ते एकमेव होते ज्यांनी सर्व प्रतिवादी दोषी नसल्याचा आग्रह धरणारा व निकाल सादर केला. यासुकुनी श्राइन आणि क्योतो र्योझेन गोकोकू श्राइनमध्ये खास पाल यांना समर्पित स्मारके आहेत. त्यांना १९५९ साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राधाबिनोद पाल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.