राझ: द मिस्ट्री कंटिन्युज किंवा राझ २ हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला मोहित सूरी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील अलौकिक भयपट आहे. या चित्रपटात इमरान हाशमी, कंगना राणावत आणि अध्ययन सुमन यांच्या भूमिका आहेत तर जॅकी श्रॉफ एका विशेष भूमिकेत आहे. हा चित्रपट राझ मालिकेतील दुसरा भाग आहे, परंतु कथानक २००२ च्या राझ चित्रपटाला थेट पुढे नेत नाही. हा चित्रपट भारत आणि सभोवतालच्या जगात प्रचलित असलेल्या भूतांच्या मुद्द्यांशी संबंधित आहे. हा चित्रपट अलौकिक घटनांबद्दलच्या व्यक्तीच्या विश्वासांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतो. इमरान हाशमी पृथ्वी नावाच्या चित्रकाराची भूमिका साकरतो, ज्याच्याकडे एक असाधारण देणगी आहे, भविष्य रंगवण्याची. त्याची चित्रे नंदिताचे (कंगना राणौत) भविष्य सांगतात.
हा चित्रपट २३ जानेवारी २००९ रोजी प्रदर्शित झाला. त्याला सामान्यतः मिश्रित पुनरावलोकने मिळाली, ज्यात कामगिरी आणि संगीताची प्रशंसा झाली, परंतु त्याच्या गतीबद्दल टीका झाली. १८ कोटी (US$४ दशलक्ष) ( ) च्या बजेटमध्ये बनवण्यात आले असून या चित्रपटाने ३८.०९ कोटी (US$८.४६ दशलक्ष) कमावले.
राझ: द मिस्ट्री कंटिन्युज
थोडक्यात पण महत्त्वाचे.