राउल मोदेस्तो कास्त्रो रुझ (स्पॅनिश: Raúl Modesto Castro Ruz; जन्म: ३ जून १९३१) हा क्युबा देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. फेब्रुवारी २००८ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला कास्त्रो २००६ ते २००८ दरम्यान कार्यवाहू राष्ट्राध्यक्ष होता. राउल कास्त्रो क्युबा कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस देखील आहे.
क्युबन क्रांतीकारी व प्रदीर्घ काळादरम्यानचा राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो ह्याचा धाकटा भाऊ असलेला राउल कास्त्रो १९५० च्या दशकापासून क्युबामधील सर्वात बलाढ्य नेत्यांपैकी एक राहिला आहे. तो १९५९ ते २००८ दरम्यान क्युबाचा लष्करप्रमुख व संरक्षणमंत्री होता.
डिसेंबर १९७६ पासून क्युबाचा राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या फिदेल कास्त्रोला जुलै २००६ मध्ये आजारपणामुळे अचानक सत्ता सोडावी लागली. त्याने राउल कास्त्रोला कार्यवाहू राष्ट्राध्यक्षपदावर नेमले. फेब्रुवारी २००८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीने राउलची अधिकृतपणे राष्ट्राध्यक्षपदावर निवड केली. त्याच्या कार्यकाळामध्ये डिसेंबर २०१४ मध्ये क्युबा व अमेरिका देशांनी १९६१ पासून बंद असलेले राजनैतिक संबंध पुनर्प्रस्थापित केले.
राउल कास्त्रो
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.