रणदुल्लाबाद

या विषयावर तज्ञ बना.

रणदुल्लाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.या गावाला शिवकालीन इतिहास लाभलेला आहे. आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या सामना केला. आदिलशहाचा सरदार असलेल्या अफजलखानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी रणदुल्लाबाद हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर तालुका पुरंदर येथील जगताप बंधू वाईचे पिसाळ देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती.

लढाईनंतर जगताप पिसाळ देशमुख यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच रणदुल्लाबाद गाव वसले. या गावात जगताप यांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफजलखानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्लाखान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवाजी राजे यांच्या बरोबर रणदुल्लाखान होता.

या दोघांची मैत्री ही आदिलशाही साठी डोके दुखी होती, त्यामुळे रणदुल्लाखान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगर रांगेजवळच्या जागेत खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत जगताप देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते, त्या ठिकाणी अफजलखानाने त्यांच्यावर विषप्रयोग करून रणदुल्लाखानला संपवूनत्याची कबर बांधली. त्यानंतर अफजलखानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले.

गावात हिंदू मुस्लिम ऐक्य असून मोहरम आणि ईद साजरी केली जाते.

२०११ च्या जनगणनेनुसार या गावाचा सेन्सस कोड ५६३६१० असून या लेखातील माहिती या जनगणनेवर आधारित आहे. या गावाचे क्षेत्र ७९९.०१ हेक्टर असून येथील लोकसंख्या १८५७ आहे. गावात ३९५ कुटुंबे राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →