रकिबुल हसन (क्रिकेट खेळाडू)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रकीबुल हसन (जन्म ९ सप्टेंबर २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने २३ मार्च २०१९ रोजी २०१८-१९ ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये शाइनपुकुर क्रिकेट क्लबसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.

डिसेंबर २०१९ मध्ये, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले. २१ जानेवारी २०२० रोजी, स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात, त्याने हॅटट्रिक घेतली. त्याने ६ डिसेंबर २०२० रोजी २०२०-२१ बंगबंधू टी-२० कपमध्ये गाजी ग्रुप चट्टोग्रामसाठी ट्वेंटी-२० मध्ये पदार्पण केले.

फेब्रुवारी २०२१ मध्ये, बांगलादेशच्या उदयोन्मुख संघात आयर्लंड वॉल्वेसविरुद्धच्या त्यांच्या घरच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. त्याने २२ मार्च २०२१ रोजी २०२०-२१ राष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये ढाका मेट्रोपोलिससाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. डिसेंबर २०२१ मध्ये, वेस्ट इंडीजमध्ये २०२२ च्या आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →