योहान सेबास्टियन बाख (जर्मन: Johann Sebastian Bach) (मार्च ३१, इ.स. १६८५ - जुलै २८, इ.स. १८५०) हा जर्मन संगीतकार होता. पाश्चात्य संगीतकारांपैकी एक महान संगीतकार म्हणून याची गणना होते. बाख कुटुंबातील अनेक सुविद्य संगीतकारांपैकी सगळ्यात प्रख्यात असल्यामुळे योहान सेबास्टियन बाखाचा उल्लेख नुसता बाख या नावानेही होतो.
बाखाने निर्माण केलेल्या बरोक प्रकारच्या समूह - गान (क्वायर ), वाद्य - वृंद (ऑर्केस्ट्रा) आणि एकल (सोलो) संगीताने या प्रकारच्या संगीताला आकार मिळाला व तद्नंतर हे संगीत इतर संगीतविद्वानांत मान्यताप्राप्त झाले.
बाखाने स्वतःची अशी शैली निर्माण केली नसली तरी त्यावेळच्या जर्मन शास्त्रीय संगीत शैलीत भर घातली. याने इटली व फ्रांसमधील शास्त्रीय संगीतातील काही शैली जर्मन संगीतात आणल्या.
योहान सेबास्टियन बाख
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.